गांधी रोडवरील कपड्याच्या दुकानाला दुकानाला भीषण आग
अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी रोडवरील श्री स्वामी संकुल येथील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात जीवित हानी झाली नाही.
सुपरस्टार कलेक्शन या कपड्याच्या दुकानाच्या गोदाऊनला आग लागल्याचे धूर निघत असल्याचे चौकीदाराच्या लक्षात येतात त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला. सुपरस्टार कलेक्शनच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला होता. गोदामाला आज सकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये विविध कंपन्यांच्या कपड्यांचा माल साठवून ठेवण्यात आला होता तो जळून खाक झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी आग नियंत्रणात आणली.
0 टिप्पण्या