Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंनी भारतीय संघामध्ये पटकावले ३ सुवर्ण पदक 

अकोला जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंनी भारतीय संघामध्ये पटकावले ३ सुवर्ण पदक 


संयुक्त भारतीय खेळ फाउंडेशन च्या वतीने नेपाल पोखरा सिटी ७ वी आतंरराष्ट्रीय खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंनी भारतीय संघामध्ये खेळुन ३ सुवर्ण पदक पटकावले


संयुक्त भारतीय खेळ फाउंडेशन च्या वतीने नेपाल येथे १६ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जगभरातून ९ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ७५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील १४ वर्षाआतील वयोगटात गणेश परमेश्वर वानखडे यांनी ३० kg वजन गटात खेळुन नेपाल येथील खेळाडुला पराभूत केले व सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला तसेच १७ वर्षाआतील वयोगटात सुजल सचिन काळबेंडे यांनी ४५ kg वजन गटात खेळुन श्रीलंका येथील खेळाडूला पराभूत केले तसेच आविष्कार सुनील भोजने याने १७ वर्षाआतील वयोगटात ४० kg वजनगटात खेळुन तुर्की देशाच्या खेळाडुला पराभुत करुन सुवर्ण पदक पटकावले आहे या खेळाडूंना आतंरराष्ट्रीय तायक्वांडो पंच व क्रीडा प्रशिक्षक अनंत पाचकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडुंचे भारतीय संघटनेचे अध्यक्ष पंकज गवले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल मालवी सुवर्णकार महासंघ अकोला मा.विलासराव अनासाने व प्रमोद बुटे व खेळाडूंचे पालक व शिक्षक वर्ग यांनी रेल्वे स्थानकावर पोहचताच खेळाडूंचे हार पुष्प चा वर्षांव करून स्वागत केले व पुढील स्पर्धेकरीता अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या सुवर्ण कामगिरी मुळे या खेळाडूंचे अमेरिका येथे जुलै २०२३‌ मधे होणार्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या