Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या वतीने मुर्तिजापूर तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

शिवसेनेच्या वतीने मुर्तिजापूर तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन


शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात
शिवसेनेचा एल्गार


बाळासाहेब गणोरकर
अकोला जिल्हा प्रतिनिधी
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असताना मोजक्याच शेतकऱ्यांना सरकारच्या उदासीन धोरणामुळे मदत मिळणार आहे. पीकविम्याच्या बाबतीतही लाखो शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या गेल्या असून शेतकयांच्या या प्रश्नावर शिवसेनेने सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी ११ वाजता शक्तीप्रदर्शन करीत मुर्तिजापूर तालुक्यात ठीकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले . शिवसेनेचे मुर्तिजापूर तालुकाप्रमुख संगीत कांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिव सेनेचे कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांतील शिवसेनेचा हा सर्वाधिक मोठे आंदोलन ठरले. परतीच्या पावसात अतिवृष्टीने जिल्ह्यासह तालुक्याला झोडपून काढले. पीकविम्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर प्रलंबीत असताना शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने या आंदोलनाचे आयोजन केले होते.


भगवे रुमाल , झेंडे व टोप्या घालुन शिवसैनिक राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती व नियोजित स्थळी दाखल होवून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आंदोलनात वातावरण निर्मिती केली .
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी अकोला जिल्ह्यासह मुर्तिजापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी.
 पीक विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे.
पूरग्रस्तांचे व खरडून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी अश्या विविध मागण्यांसंदर्भात तालुक्यातील लाखपूरी , हातगाव ,अनभोरा ,गाझीपुर , कुरुम ,कंझरा , जामठी फाटा , हिरपूर येथे शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . पोलिसांनी आंदोलकांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणून अटकपूर्व जामीन देवून सोडण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख संगीत कांबे , उपतालुकाप्रमुख विजय साबळे , उदय शिंदे , पवन जाधव , शहरउपप्रमुख बालू टाक , बंडू राऊत , बाबाराव घाटे , ज्ञानेश्वर म्हसाये , किसना गावंडे , पांडुरंग कवटकर ,निलेश महाजन , नाजूक गोरले , सुबोध बंग , नंदू बबनिया , प्रशांत मोंढे , चंद्रकांत अडसोड , नरेंद्र घाटोळ , भूषण आष्टीकर , आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते ---------------------------------------
 

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या