Ticker

6/recent/ticker-posts

एकाच दिवशी मुर्तीजापुर तालुक्यात दोन आत्महत्या

एकाच दिवशी मुर्तीजापुर तालुक्यात दोन आत्महत्या



पहिली घटना
मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम चिखली येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानेरात्रीच्या दरम्यान कीटकनाशक घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 रात्रीच्या दरम्यान ग्राम चिखली रहिवासी प्रकाश श्रीराम मकेश्वर वय 42 या इसमाने शेतात विषारी कीटकनाशक घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली असता.स्थानिक लोकांकडून याची माहिती पोलिसांना दिल्या गेली.पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली.आपत्कालीन पथकास पाचारण केले. आपातकालीन पथकाचे सेनापती शेवतकर, नारू अण्णा, सुमित, शेख साबीरच्या टिमने घटनास्थळावर दाखल होऊन सदर मृतकास श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.सदर घटनेचा तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कळमकर व अंभोरे करीत आहे.सदर मृतक हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यामागे दोन मुली एक मुलगा पत्नी व वडील आहे.



तर दुसरी घटन...


मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सिरसो येथे 28 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी रात्री सुमारास गळफास लावून आपली जीवन यात्रा संपल्याची घटना उघडकीस आली.


       प्राप्त माहितीनुसार सिरसो रहिवासी रितेश आनंद मोरे 28 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने 25 नोव्हेंबर 2022 रोजी रात्रीच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असता, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.स्थानिकांकडून ग्रामीण पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली.ग्रामीण पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करून आमदार हरीश पिंपळे संचालित जय गजानन आपत्कालीन पथकास पाचारण केले.आपातकालीन पथकाचे सेनापती शेवतकर,शेख साबीर, नारू अण्णा, सुमित, बादशाह, गब्बा या रुग्ण सेवाभावी टीमने तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन मृतकाला उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात दाखल केले.मृतक हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्या मागे पत्नी आई-वडील व एक लहान भाऊ आहे. सदर घटनाक्रमाची ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड व मंथ्यी करीत आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या