अकोला सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन
अकोला सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन करण्यात आले. अकोला ते शेगाव वारी रोड ची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रोडवर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी वारंवार निवेदन देऊनही अद्याप पर्यंत कुठलाच प्रकारची कारवाई किंवा रोडची डागडुगी करण्यात आलेली नाही आहे.
कोणतेही काम व्यवस्थित होत नसल्यामुळे हे कार्यालय फक्त आश्वासन देत झोपा काढण्याचं काम करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या उरळ येथील शेतकरी युवा पुत्र गोपाल पोहरे ह्यांचे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन केले आहे. जोपर्यंत हया रस्त्याचे काम सुरू न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
0 टिप्पण्या