अकोल्यात बापलेकाचा खून तर आई गंभीर; पिंजर पोलिस ठाण्यात गुन्हा
अकोला - पूर्ववैमनस्यातून बापलेकाचा खून तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुधलम या गावात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. प्रताप विठ्ठल पंडीत (वय 52 वर्ष) व सूरज प्रताप पंडीत (वय 26 वर्ष) असे मृत बापलेकांची नावे आहे. तर अनिता प्रताप पंडीत (वय 45 वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अकोला तालुक्यातील दूधलम गावामध्ये पंडित चुलत भावांचे कुटुंब राहते. एक ते दीड वर्षांपूर्वी प्रताप पंडित आणि किशोर पंडित यांच्यामध्ये सांडपाणी व इतर किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या घटनेच्या तक्रारी पिंजर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केल्यानंतर बुधवारी या संदर्भामध्ये न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी हे दोन्ही कुटुंब न्यायालयात असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला. हे दोन्ही कुटुंब रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. किशोर जगन्नाथ पंडित, चंदा किशोर पंडित, रोशन किशोर पंडित, कार्तिक किशोर पंडित, बंडू जगन्नाथ पंडित, निर्मला जगन्नाथ पंडित व एका अल्पवयीन बालकाने मिळून प्रताप विठ्ठल पंडित, सुरज प्रताप पंडित, अनिता प्रताप पंडित यांच्यावर कुऱ्हाड, कैची, दगडाने हल्ला केला. यामध्ये प्रताप पंडित आणि सुरज पंडित हे जागीच ठार झाले. तर अनिता पंडित यांच्या हातावर दुखापत झाली
0 टिप्पण्या