२६\११ शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मरणार्थ मशाल रॅली चे आयोजन
आधी मान खाकीचा आणि मग बाकीचा
ना जाती साठी ना पाती साठी एक दिवस एक क्षण पोलिसांसाठी
२६/११/२००८ रोजी दहशतवाद्यांनी देशाची देशाची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई वर भ्याड हल्ला केला.या हल्ल्यामध्ये आपल्या पोलीस बांधवानी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाचे बलिदान देऊन सामान्य नागरिकांचे व देशाचे रक्षण केले.पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र नसताना सुद्धा दहशतवाद्यांनाचा सामना केला व देशाला संकटातून वाचवले.त्यांचे हे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २६/११ मध्ये शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समरणार्थ मशाल रॅली चे आयोजन केले आहे. मशाल रॅलीचा मार्ग हा अशोक वाटिका चौक ते नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय ठीक संध्याकाळी 6 वाजता असेल. तसेच श्रद्धांजली स्थान नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय समोर असणार आहे.सर्व अकोला करांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हा अकोला तर्फे आवाहन करीत आहो की पोलीस प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या त्या बलिदानासाठी आपण उपस्थित राहू. महाराष्ट्र पोलीस यांचा सन्मान वाढवू...
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या