Ticker

6/recent/ticker-posts

अकोला मनपाची दाना बाजारात थेट अतिक्रमण मोहीम

अकोला मनपाची दाना बाजारात थेट अतिक्रमण मोहीम


मनपा आयुक्तांनी दिला अतिक्रमण धारकांना अतिक्रमण स्वतःहून काढण्याकरिता आठ दिवसाचा वेळ





दाणा बाजारातील 87 व्यवसायिकांना सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत दैनंदिन व्यापार करण्याची सशक्त परवानगी महापालिकेने देउन महापालिका त्यांच्या कडून दैनंदिन शुल्क पावती आकारायची परंतु ही अट व शर्तीनुसार ठरविण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी शर्ती व अटींचा भंग करीत कच्च्या व पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केले होते या ठिकाणी सदर जागेचा वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला होता दरम्यान न्यायालयाने महापालिकेला अतिक्रमण उठवण्याचे आदेश दिले त्या आदेशाला अनुसरून आज मनपा आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला अतिक्रमण करण्याचे आदेश दिले अतिक्रमण निर्मूलन पथक दाना बाजार येथे दाखल झाले असता मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते काँगेस चे साजिद पठाण यांनी यावेळी प्रशासनाकडे व्यापाऱ्यांची बाजू मांडत प्रशासनाकडून अतिक्रमण न काढन्याकरिता कालावधी मागितला त्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी आठ दिवसांचा कालावधी व्यापाऱ्यांना स्वतः अतिक्रमण काढण्याकरिता दिला आहे



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या