इंडीगो कारची ट्रॅक्टरला धडक : १ ठार, १ जखमी
मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्यानजीक भरधाव जाणारी इंडीगो कार व ट्रॅक्टर या दोन वाहनांची अमोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात कारचालक घटनास्थळी ठार झाला असून ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
माना येथील ट्रॅक्टर ट्रॅली क्र. एम एच ३० जे ४८० या वाहनाने जामठीकडून माना येथे माल भरून जात असताना डीवायडर ओलांडताना अकोल्याकडून अमरावतीकडे जाणारी इंडीगो कार क्र. एम एच ४४ बी ०८८६ या दोन वाहनांची अमोरासमोर जोरदार धडक झाल्याने कार चालक रोशन शंकर ढोक (३५) रा. अकोला हा घटनास्थळी ठार झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून, अपघातात इंडीगो कारची समोरची बाजू तसेच ट्रॅक्टरचा चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती माना पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मृतकाला मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
चुकीच्या डीवायडरने घेतला बळी. गावात जाण्याच्या ठिकाणी डीवायडर करून रस्ता देण्यात आला. मात्र हा डिवायडर चुकीच्या ठिकाणी देण्यात आल्याने सदरचा अपघात घडून आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सैरावैरा रहदारीवर माना सर्कल येथील प्रशासनाचे कंट्रोल नसल्यानेच अपघाताच्या संख्यांमध्ये दिवसान दिवस भर पडत आहे. तरी संबंधीत विभागाने माना येथील गावकऱ्यांना विश्वासात घेवून नवीन डीवायडर बनविण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या