Ticker

6/recent/ticker-posts

अकोला-अकोट रेल्वे शटल सेवा सुरू दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सूचना

अकोला-अकोट रेल्वे शटल सेवा सुरू दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सूचना


अकोला अकोट मार्गावर् रेल्वे शटल सेवा तात्काल् सुरु करन्याच्या कामाला आला वेग ,रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी लागले कामाला जिल्ह्याचे पालक मंत्री व् उपमुख्यमंत्री देवेन्द्र् फडणवीस , खासदार् संजय भाऊ धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर्, आमदार प्रकाश भारसाकले यांच्या प्रयत्नाना मिळाले यश , अकोला अकोट मार्गावरिल् यात्रेकरुना मिळणार रेल्वे शटल ने प्रवास करण्याची लवकरच सुविधा.




गांधीग्राम येथील पुलास तडा गेल्याने या मार्गावरील रस्ते वाहतूक बंद झाली असताना, आता अकोला ते अकोट या तयार असलेल्या ब्रॉडगेज लोहमार्गावरून लवकरच शटल सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे वचन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेत दिले आहे. अकोला-अकोट रेल्वे शटल सेवा सुरू दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सूचना नुकत्याच मिळाल्या आहेत. गांधीग्राम येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने अकोट तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अकोला ते अकोट शटल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्यासह आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून अकोला ते अकोट लोहमार्गावरून रेल्वे शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी येत्या लवकरच शटल सेवा सुरू करण्याचे अभिवचन देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. तशा सूचनाही त्यांनी रेल्वे प्रशासनाला केल्याची माहिती जिल्हा भाजपकडून देण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या