Ticker

6/recent/ticker-posts

शहर वाहतूक नियंत्रण मार्फत वाहतूक नियम याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


शहर वाहतूक नियंत्रण मार्फत वाहतूक नियम याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


आज रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सुरू असलेल्या एनसीसी चे वार्षिक प्रशिक्षण शिबिरा मध्ये शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत वाहतूक नियंत्रण व वाहतूक नियम याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


      सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमानबाबत अवगत करून रस्त्यावर वाहतूक नियंत्रण कसे करण्यात येते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान त्यांना वाहतूक सिग्नल ची ओळख करून देण्यात आली, रस्त्यावरून चालताना फुटपाथ चा वापर करणे, रस्ता ओलांडण्याकरिता झेब्रा क्रॉसिंग चा वापर करणे, ड्रायव्हिंग लायसन असल्याशिवाय वाहन न चालविणे, ड्रायव्हिंग लायसन व वाहनाची इतर कागदपत्रे नेहमी सोबत बाळगणे, दरम्यान वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करणे बाबत योग्य दक्षता घेणे, मादक द्रव्याचे सेवन करून कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईल वर संभाषण करू नये इत्यादी सर्व त्या आवश्यक बाबीं बाबत मार्गदर्शन करून एनसीसी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच त्यांच्या संपर्कातील इतर लोकांनाही त्याबाबत अवगत करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.


       श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचे मार्गदर्शनात वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सुधाकर डाबेराव, महिला पोलीस अंमलदार दिपाली नारनवरे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी माने यांनी प्रशिक्षणा करिता उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व नियंत्रण बाबत प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण शिबिरा करिता एनसीसी चे एकूण 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. अशी माहिती श.वा.नि.शाखा, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.
 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या