Ticker

6/recent/ticker-posts

भारत देशाचे पहिले मतदार यांचे वयाच्या 106 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

भारत देशाचे पहिले मतदार यांचे वयाच्या 106 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन



भारत देशातील पहिले मतदार मास्‍टर #श्‍यामशरणनेगी (१०६ वर्ष) यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते हिमाचल प्रदेशातील किन्‍नौर जिल्ह्याच्या काल्पा येथील रहिवासी होते. 


श्याम शरण नेगी यांच्या जीवनाविषयी
सुरकुतलेला चेहरा आणि जर्जर झालेलं शरीर. हातात काठी नसेल तर दोन पावलंही टाकता येत नाहीत. काही पावलं चाललं की लगेच धाप लागते. हे आहेत 106 वर्षांचे श्याम शरण नेगी. 'स्वतंत्र भारताचे पहिले मतदार' ही नेगी यांची ओळख. त्यांना भारतीय लोकशाहीचे 'लिव्हिंग लेजंड' असंही म्हणतात. 1 जुलै 1917 रोजी नेगी यांचा जन्म झाला. ते भारताचे सर्वांत वयोवृद्ध मतदार आहेत. तरुण मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं उदाहरण दिलं जाईल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. शिमल्यापासून जवळपास 280 किमी दूर किन्नोर जिल्ह्यातील अतिशय देखण्या अशा कल्पा गावात ते राहतात. बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत असलेल्या एका टुमदार लाकडी घरात आमच्या त्यांच्याशी गप्पा रंगल्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला. ऑक्टोबर 1951मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान केलं आहे. त्यानंतर एकही निवडणूक त्यांनी चुकवली नाही. आपल्या मताचं महत्त्व त्यांना चांगल कळतं होते. शरीर साथ देत नसले तरीही आत्मशक्तीच्या बळावर ते मतदान करत आलो आहे. यावेळीसुद्धा त्यांना मताधिकार वापरायचा होता,परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान करू शकले नाहीत.


श्याम शरण नेगी यांची पहिले मतदान म्हणून ओळख
स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत किन्नोरमध्ये 25 ऑक्टोबर 1951 रोजी मतदान झालं होतं. खरंतर फेब्रुवारी-मार्च 1951 ला मतदान होणार होतं. मात्र किन्नोरमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे तिथे तब्बल पाच महिने आधीच मतदान घेण्यात आलं. त्यावेळी नेगी शेजारच्या मुरांग गावात शिक्षक होते. मात्र त्यांचं नाव कल्पाच्या (त्याकाळी चिन्नी म्हणून ओळखलं जायचं) मतदार यादीत होते. नेगी यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाही ,मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभेची किंवा मग लोकसभेची. त्यांचं मतदान केंद्र कल्पा 51 आहे. तिथे एकूण 928 मतदार आहेत. यात 467 महिला आहेत. 
          #ShyamSaranNegi


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या