Ticker

6/recent/ticker-posts

रुपचंद नगरवासी भोगतायेत नरकयातना

रुपचंद नगरवासी भोगतायेत नरकयातना


अकोला महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या रूपचंद नगर प्रभाग क्रमांक 18 येथील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात नरक यापनाभोगत आहेत या रूपचंद नगर मधील स्थानिक रहिवाशांच्या घरामागून नाल्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे त्यामुळे या नाल्यातील घाण सांडपाणी लोकांच्या आवारात तसेच इजा करणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत आहे या सांडपाण्यामुळे येथील शाळकरी मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या अत्यंत घाण सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचे शाळकरी मुला मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे स्थानिक रहिवासी यांना रूपचंद नगर हा ग्रामीण भाग अकोली ग्रामीण भागात येत होता.


 त्यावेळेस या परिसराची नित्यनेमाने साफसफाई होत होती परंतु रूपचंद नगर एरिया जेव्हापासून महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाला आहे तेव्हापासून रूपचंद नगरात कुठल्याच प्रकारची साफसफाई होत नाही पिण्याच्या पाण्याचे नळ नाहीत विद्युत पोलवर लाईट नाहीत रूपचंद नगराच्या मुख्य प्रवेश दराजवळ खूप मोठ्या प्रमाणात या नाल्यातील सांडपाणी येथे जमा होते त्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे करिता आज स्थानिक रूपचंद नगर रहिवासी यांनी महानगरपालिका उपायुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग येथे निवेदन देऊन सदर नाल्याचे काम त्वरित करण्यात यावे ही मागणी केली अन्यथा रूपचंद नगर वाशी महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेणार आहेत असा इशारा देण्यात आला यावेळेस सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे अरुण गवई ,जगतपाल जाधव संजय तेलगोटे, प्रवीण सांगळे, वामनराव खंडारे ,दत्तात्रय सांगळे संतोष शिरसाट तेजराव इंगळे, मनीष दाभाडे, मुन्ना श्रीवास, संतोष दुबे आदी प्रभाग क्रमांक 18 मधील रूपचंदनगरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या