राज्यपाल कोशायरी यांच्या विरोधात अकोल्यात निदर्शने
औरंगाबाद येथे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभा दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकेरी वक्तव्य केल्याने पुन्हा भगतसिंग कोश्यारी आपल्या बेताल वक्त्यावरून पुन्हा चर्चेत आले आहेत. ज्या महापुरुषाची ही धरती म्हणून ओळख आहे अशा महान संत व्यक्तींबद्दल अपमानस्पद बोलणे, राज्यपाल कोशायरी यांना चांगलेच भारी पडताना दिसत आहे. आज अकोल्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने तर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर राज्यपाल कोशायरी यांच्या विरोधात तीव्र निर्दर्शने देऊन आंदोलन करण्यात आले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांनी यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात विरोध दर्शविला असून भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून लवकरात लवकर हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या