Ticker

6/recent/ticker-posts

अखेर अकोट अकोला रेल्वे सुरू होण्याची डी आर एम उपेंद्र सिंह यांनी केली घोषणा

अखेर अकोट अकोला रेल्वे सुरू होण्याची डी आर एम उपेंद्र सिंह यांनी केली घोषणा


आ.रणधीर सावरकर  व रेल्वे अधिकारी डी आर एम उपेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर पत्रकार परिषद


अकोला
खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मागणीची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन अकोट अकोला रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला त्याची फल श्रुती म्हणून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्लॅटफॉर्म नंबर सहा अकोला उद्घाटन सोहळा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या शुभहस्ते राज्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हैदराबाद डीआरएम तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आदींच्या उपस्थितीत यांच्या हा सोहळा होणार आहे. धर्मा त नांदेड डी आर एम उपेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत बैठक घेऊन कार्यक्रमाला अंतिम रूप दिले.


गांधीग्राम येथील पूल दुरुस्ती वेळ असल्यामुळे नवीन पूल सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे नागरिकांना होणारा त्रास याची दक्षता खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी घेऊन आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना मुंबई येथे पाठवून रेल्वेमंत्री अश्विन वैष्णवी तसेच रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा ची जबाबदारी सोपवली आमदार सावरकर यांनी आपले सहकारी आमदार शर्मा आमदार भारसाकडे आमदार पिंपळे आमदार खंडेलवाल यांच्या सहकार्याने जनता जनार्दनाला होणारी त्रास व त जनतेची मागणीची लक्ष्यात घेता आठ डब्याची रेल्वे अकोट अकोला दोन फेऱ्या सुरू करण्याची मान्यता मिळवली 23 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता प्लॅटफॉर्म नंबर सहा वर ऑनलाईन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हिरवी झेंडी दाखवणार आहे अकोले करांच्या साक्षीने ही रेल्वे सुरू होणार आहे आज स्थानिक प्लॅटफॉर्म नंबर एक वर आमदार सावरकर यांनी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने अकोट आमला खुर्द या रेल्वे मार्गाच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली व त्या कामाला गती प्राप्त होत असल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वेमंत्री वैष्णव तसेच रेल्वे अधिकारी यांचे अभिनंदन केले तसेच मध्य रेल्वे दक्षिण रेल्वे यांची लाईन या संदर्भात होणारी अडचण समजून घेतली तसेच शिवनी इथे शेड संदर्भात सुद्धा चर्चा विनिमय केला प्लॅटफॉर्म नंबर सहा मधील रेल्वे शेड वाढवण्या संदर्भात सुद्धा त्यांनी चर्चा केली तसेच अकोट अकोला यामधील शनिवार ही रेल्वे थांबणार असून तीस रुपये तिकीटने हा प्रवास करता येणार आहे रेल्वेने ठेवलेली वेळ सुद्धा बदलण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला तसेच पेट्रोल नंबर सहावर सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी दिले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या यावेळी अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी सुद्धा रेल्वे प्रवासाच्या अडीअडचणी मांडल्या दक्षिण व मध्य रेल्वे यांच्यामधील होणारी अडचणी व समय वन संदर्भात सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी अनुपधोत्रे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे नेते अशोक गुप्ता वसंत बाछुकाज्ञान प्रकाश खंडेलवाल, सुभाष सिंग ठाकूर किशोर पाटील जयंत मसने शंकरराव वाकोडे गिरीश जोशी माधव मानकर विवेक भरणे राजेश बेले, संजय जीरापुरे संजय गोडा संजय गोटफोडे, गणेश अंधारे संतोष पांडे एडवोकेट देवाशिष काकड निलेश निनोरे राजेंद्र गिरी अमोल गोगे विकी ठाकूर अक्षय जोशी गजानन लोणकर प्रदीप नंदापुरे राजेश मिश्रा, भूषण सारसे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वेळी रेल्वेचे अधिकारी डी आर एम उपेंद्र सिंग, शिंदे, कवडे, धीरेंद्र सिंग धीरेंद्र कुमार, रितेश कुमार ,काकड, अमोल वरपे, सीनियर सीएम डीसीएम नागेंद्र प्रसाद यांनी सुद्धा यावेळी पाहणी करून रेल्वे प्रवाशांच्या समस्या व लोकप्रतिनिधींच्या समस्या व सरकारकडे असलेले पाठपुरावा रेल्वे प्रशासनाची भूमिका समजून घेतली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या