Ticker

6/recent/ticker-posts

खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा सभेत राष्ट्रगीता ऐवजी भलतेच गाणे

खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा सभेत राष्ट्रगीता ऐवजी भलतेच गाणे

राष्ट्रगीता दरम्यान सर्वांचा गोंधळ दिसला नियोजनाचा अभाव



अकोला जिल्ह्यादरम्यान सभेनंतर राष्ट्रगीता ऐवजी भलतेच गाणे सुरू झाले, त्यामुळे सर्वांचा एकच गोंधळ उडाला होता. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपूर्ण भारतभर सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आज वाशिम जिल्ह्यामधून अकोला जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. आज पातूर येथे भव्य सभा आयोजित केली होती. या सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्याचे आयोजिले होते. सभा झाल्यानंतर राष्ट्रगीत लावण्याऐवजी भलतेच गाणे सुरू झाले. यामुळे सभेदरम्यान एकच गोंधळ उडाला होता. गाणे व्यवस्थित केल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले, परंतु पुन्हा तोच गोंधळ राष्ट्रगीत संपल्यानंतर सुरू झाला. यामुळे स्टेजवरील व सभेला आलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडालेला दिसला. यावेळी भारत जोडो यात्रेमध्ये नियोजनाचा अभाव यावेळी दिसून आला. विरोधकांना विरोध करण्यासाठी आयतीच संधी काँग्रेसने निर्माण करून दिल्याचे यावेळी बघावयास मिळाले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या