नोंदणीकृत असंघटित मजुरांच्या विविध मागण्यांसाठी निघाला मोर्चा ,मात्र पोलिसांनी अडवला
अकोला --- नोंदणीकृत मजुरांच्या हक्कासाठी, मजुरांच्या सर्वांगीण विकासाच्या मागण्या घेऊन बिल्डिंग, पेंटर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या वतीने आज १५ नोव्हेंबरला स्थानिक अशोक वाटिका येथून सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार होता मात्र सुरक्षेचे कारण देऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा न निघताच केवळ शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
नोंदणीकृत सदस्यांच्या पाल्यांसाठी दर्जेदार निवासी शाळा सुरू करा, मध्यान्ह भोजन बंद करून नोंदणीकृत सदस्यांना ३००० /- रू. प्रतिमाह द्या, नोंदणीकृत सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील प्रशिक्षण देवून साहित्य, यंत्रसामुग्री प्रदान करा व मजुरांना "आत्मनिर्भर" बनवा,. नोंदणीकृत सदस्यांना स्मार्टकार्ड तात्काळ द्या , बि .ओ .सी. च्या नोंदणी, नुतनिकरण तथा विविध योजनांचे प्रस्ताव कालमर्यादेत निकाली काढा, आदी मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज 15 नोव्हेंबर ला मजूर मोर्चाचे आयोजन करण्यात होते हजारों च्या संख्येने हजारो मजुरांनी सहभाग नोंदविला होता मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण देऊन मोर्चाला परवानगी नाकारली मात्र जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, सचिव- पंचशिल गजघाटे, उपाध्यक्ष राजेंद्र इंगोले, अनिल वाघमारे, भास्कर सोनवणे, नामदेव निखाडे, बंशिलाल तायडे, सुरेश मेथे, . महिला जिल्हा अध्यक्ष : अनुराधा ढिसाळे, महिला मोलकरीन संघ, कल्पना सुर्यवंशी, सुनिता गजघाटे, वंदना इंगळे, देवकाबाई सिरसाट, वर्षा पिंगळे, शारदा वानखडे, करूणा गवई, उज्वला तायडे, कल्पना मेंढे,नजमा परविन आरिफ खान, सुलताना परविन सिकंदर खां, सुनिता नृपनारायण, कांचन महाजन, विद्या खडसे, छाया सोळंके, वर्षा वाघ, कमला जंजाळ, उज्वला टाकसाळ, सिमा गवई, मंगला अंभोरे,, सविता वानखडे सह हजारो मजूर उपस्थित होते




0 टिप्पण्या