Ticker

6/recent/ticker-posts

अकोटचे ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज यात्रेस प्रारंभ

अकोटचे ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज यात्रेस प्रारंभ


गोपालकाला व दहीहंडी संपन्न


अकोटःवऱ्हाडातील प्रसिद्ध शहराचे ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज यात्रेस गोपाळ काला व दहीहंडी महोत्सवाने सोमवार दि. 14 पासुन प्रारंभ झाला आहे. दुपारी चार वाजता शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पालखी नगर परिक्रमा करून मंदिरात पोहोचताच गोपाल काला व दहीहंडी उत्सवाने यात्रेस सुरुवात झाली. श्री संत नरसिंग महाराजांचा यात्रा महोत्सव संपूर्ण वऱ्हाडात प्रसिद्ध आहे.अमरावती विभागातले पाचही जिल्ह्यातील हजारो भाविक भक्त व व्यापारी वर्ग या यात्रा महोत्सवांमध्ये येत असतात. यात्रा महोत्सवाची सुरुवात श्री संत नरसिंग महाराजांच्या तीर्थस्थापनेने झाली. बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर 2022 ला श्री संत नरसिंग महाराजांची तीर्थस्थापना झाली. श्री संत नरसिंग महाराजांची गुरु श्री संत मियासाहेबांची तक्त स्थापना शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 ला झाली तसेच श्री संत नरसिंग महाराजांची पालखी शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुपूजनासाठी उमरा येथे गेली होती. 


श्रींची पालखी ह भ प श्री सुभाष बुवा वर्मा व ह भ प अनंतराव देशमुख राहणार कुटासा यांचे नेतृत्वात सकाळी साडेनऊ वाजता नगर प्रदक्षिणेसाठी निघून शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत यात्रा चौकातून मंदिरात साडेचार वाजता च्या दरम्यान परत आली व नंतर मंदिरात दहीहंडी व गोपाल काल्याचा उत्सव अतिशय उत्साहात पार पडला संस्थानचे अध्यक्ष सतीश आसरकर यांचे हस्ते गोपाल काल्याची महापूजा करण्यात आली. यात्रा सुमारे महिनाभर चालणारा असून विविध पारंपारिक वस्तूंची विक्रेते शेकडो व्यापारी प्रसादाचे खेळण्याचे गृहपायोगी साहित्याची आकर्षक दुकाने थाटलेली आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या