मानव सेवा फाऊंडेशन आकोला अंतर्गत अन्नदान वितरण
मानव सेवा हिच ईश्वर सेवा हा वसा घेऊन मानव सेवा फाऊंडेशन आकोला हे मंडळ गेल्या नोव्हेंबर 2018 पासुन म्हणजे 4 वर्षे पूर्ण होऊन आज 5व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत त्यात अविरत गोरगरीब व गरजवंत नागरिकांना अन्नदान वितरित करणे, प्रत्येक वर्षी नोव्हेंबर / डिसेंबर महिन्यात गरजवंत वंचित व उपेक्षित बंधु भगिनींना ब्लँकेट्स वाटप, पावसाळ्यात वृक्षारोपण कार्यक्रम, पंढरपुरला पायी वारी करण्याऱ्या वारकऱ्यांची सेवा इत्यादि कार्यक्रम मंडळामार्फत राबविण्यात येतात.
आज दि. 5 नोव्हेंबर 2022 नियमित ठरल्याप्रमाणे लेडी हार्डींग हाॅस्पिटल ( शासकीय स्त्री रुग्णालय) आकोला येथे अन्नदान वितरण करण्यात आले. या अन्नदानाचे श्री जगदीश राठोड यांनी त्यांच्या सासूबाई स्व.उषाबाई नथ्थुसिंगजी आडे यांच्या पुण्यस्मृतीप्रित्यर्थ अन्नदाते आहेत. तसेच मिष्टान्न वाटप श्री वसंतराव खोलकुटे यांचे मार्फत होते.याप्रसंगी जगदीशभाऊ राठोड, कैलासभाऊ हिवराळे, राजेशभाऊ धनगावकर, विवेक सातपुते सर, राहुल खंडाळकर, सितारामजी मुंदडा, वसंतराव खोलकुटे,शुभम कुमार होले ,अनिकेत होले, शिध्दोधनभाऊ व इतर सर्व सन्मानिय सदस्य हजर होते. मंडळामार्फत जगदीशभाऊ राठोड व वसंतराव खोलकुटे तथा सर्व सन्मानिय सदस्यांचे विवेक सातपुते सरांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या