बाबूजी देशमुख वाचनालय ' महात्मा गांधी ' वक्तृत्व स्पर्धा
खंडेलवाल ज्ञानमंदिरची कु. कृष्णाली ब्रम्हानंद वाघ व अकोला लाॅ काॅलेजची कु.वैष्णवी हागोणे रनिंग ट्राॅफीचे मानकरी
——————————————
अकोला—बाबूजी देशमुख वाचनालयाचे वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय गटासाठी 'गांधीजींचे चरित्र आणि कार्य ' या विषयावर संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत खंडेलवाल ज्ञानमंदिर ची कु.कृष्णाली ब्रम्हानंद वाघ ही वैयक्तीक प्रथम व रनिंग ट्राॅफीची मानकरी ठरली तर महाविद्यालय गटातुन 'आजच्या काळात गांधीजींच्या अहिंसा तत्वाचे महत्व ' या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत अकोला लाॅ काॅलेजची कु. वैष्णवी हागोणे ही वैयक्तीक प्रथम क्रमांकाची व रनिंग ट्राॅफीची मानकरी ठरली.शालेय गट द्वितीय —श्रेयश दिनेश इंगळे (शंकरलाल अग्रवाल हायस्कुल),
तृतीय—श्रीहरी सुरेश राऊत( बाल शिवाजी हायस्कुल) तर महाविद्यालय गट—द्वितीय—अनुप प्रशांत कंकाळे (एल.आर.टी.काॅलेज), तृतीय—आदित्य महादेव टोळे(श्री.शिवाजी महाविद्यालय अकोला) स्पर्धेचे परिक्षण डाॅ.विवेक काटे, एम.पी.मिश्रा,प्रा.बबनराव कानकिरड यांनी केले. बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार ,सचिव -अनुराग मिश्रा,सदस्य वशिष्ठनारायणसिंह ठाकुर यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांचा रनिंग ट्राॅफी व स्मृतीचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
0 टिप्पण्या