Ticker

6/recent/ticker-posts

नवीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वीकारला पदभार तर पूर्व पोलीस अधीक्षक श्रीधर यांना निरोप

अकोल्याचे नवीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वीकारला पदभार


अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून संदीप घुगे यांची राज्य राखीव पोलीस बल समादेशक मुंबई येथील पदाहून अकोल्यात बदली झाली असून, त्यांनी आज शनिवारी सकाळी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान गुरुवारी झालेल्या बदल्यांच्या यादीमध्ये अकोल्याचे मावळते पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना पदस्थापना दिली नव्हती, ते प्रतीक्षेत होते. त्यांना शुक्रवारी संध्याकाळी हिंगोली पोलीस अधीक्षकपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या समक्ष आज नवीन पोलीस अधीक्षक यांनी आपला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वीकारला. यावेळी पूर्व पोलीस अधीक्षक यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


अकोल्याचे दबंग पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना निरोप


आज पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातून मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी सह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस जिप्सी मधून फुलांच्या वर्षवात दोरीच्या साह्याने ओढून निरोप दिला. पोलीस अधीक्षक यांची अकोला शहरांमध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण झाली होती. शहरात कोविड-19 च्या काळात त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व भारदार ठरले होते. दबंग पोलीस अधीक्षक म्हणून ओळखले जाणारे जी श्रीधर यांनी जवळपास अकोला शहरात आपली कारकीर्द अतिशय उत्कृष्टरित्या निभिली होती. आज त्यांना निरोप देताना सर्वच कर्मचाऱ्यांचे हृदय भरून येताना बघावयास मिळाले. शहरातील लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची वेगळीच छाप निर्माण झाली होती. अशा दबंग पोलीस अधीक्षकांना आज नवीन पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष नुकत्याच नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयातून निरोप देण्यात आला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या