आमदार अमोल मिटकरी यांचे मुंबई दसरा मेळाव्यावर भाकीत
खोके आणि ओके हा फक्त देखावा, खरे शिवभक्त फक्त ठाकरे मेळाव्याला
सध्या ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट शिवसेनेमध्ये पडले असून, या दोन्ही गटातर्फे मुंबई दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या राजकारण तापलेलं असताना ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. दसरा मेळाव्यावरून सुरुवातीला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा भरतो? हा प्रश्न उभा होता. दोन्ही गटातील नेत्यांनी आपले प्रतिनिधित्व शिवाजी पार्कवर दाखविले होते, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला माघार घ्यावी लागली आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा देऊन ठाकरे गटाचाच दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे घेण्यासाठी परवानगी दिली. शिवसेनेचा हा दसरा मेळावा मागील 56 वर्षापासून सर्वांच्या मनात अगदी घट्ट बसलेला आहे, परंतु मागील काही दिवसापूर्वी शिवसेनेत झालेल्या फुटींमुळे शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. त्यातूनच हा दसरा मेळाव्याचा वाद उद्भवला, परंतु आता मात्र दसरा मेळावा कुठे भरतो या ऐवजी तो कसा भरतो असा नवा वाद सुरू झाला. दोन्ही गटामधील कार्यकर्ते आपलाच मेळावा यशस्वी पणे पार पडेल, असे वक्तव्य करीत आहेत. त्यातच आज अकोल्यामध्ये दसरा मेळावा या विषयावर शासकीय विश्रामगृह येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्ष नेते सुद्धा शिंदे गटाचा दसरा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्याची हमी दाखवत आहेत. यातच अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गांधी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी गांधीबाग येथे आले असता, त्यांनी मुंबई दसरा मेळाव्यावर आपले मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा दसरा मेळावा अतिशय जल्लोसात पार पडेल, असे भाकीत केले आहे. सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडले असले तरी शिंदे गट हा शिवसेनेमधून बाहेर पडल्यासारखाच आहे. यावेळी मुंबईत दोन दसरा मेळावे भरत असले तरी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे खरा दुसरा मेळावा हा ठाकरे गटाचाच भरलेला असेल. गर्दी जुळवण्यासाठी 'खोके आणि ओके' हा कार्यक्रम फक्त देखावा आहे. गर्दी जमविण्यासाठी एक लाख, दीड लाख जुळवा जुळवा केला जात आहे. परंतु खरा दसरा मेळावा हा ठाकरे सरकारचाच असेल कारण, खरे शिवसैनिक पाहायचे असेल तर मनापासून जुळलेले शिवसैनिक पहायचे असतील तर, ती ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातील असतील, असे भाकीत आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या