भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महानगर अकोला द्वारा "सेवा पंधरवाडा" अंतर्गत रक्त तपासणी 30 ते 50 % छुट
मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत 2 ऑक्टोबर पासून दर रविवारी रेल्वे स्टेशन रोड स्थित *गुरुद्वारा* येथे रक्त तपासणी करिता येणाऱ्यांना 30 ते 50 % छुट दिली जाणार आहे. भाजपा अल्पसंख्या मोर्चा महानगर अकोला द्वारा मा नरेंदजी मोदीच्या जन्मदिवसाचे अवचितय साधून " सेवा पंधरवाडा अंतर्गत माननीय खासदार श्री संजयजी धोत्रे, आमदार श्री गोवर्धन जी शर्मा, आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर, आमदार श्री वसंजी खंडेलवाल व अकोला महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, मा महापौर सौ अर्चना ताई मसने यांच्या अध्यक्षताखाली उपचारात लोकांचे भार कमी करण्यासाठी अल्पसंख्यांक मोर्चा महानगर अध्यक्ष श्री जसमीत सिंग ओबेरॉय यांच्या नेतृत्वात दिनांक 2 ऑक्टोबर पासून गुरुद्वारा,रेल्वे स्टेशन जवळ लोकांसाठी रक्त तपासणी 30 ते 50 % छुट वर आयोजित करण्यात येत आहे.
हे तपासणी दर रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. ह्या कार्यक्रमाला गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे बबलू सेठी, रणजीत सिंह ओबेरॉय, जसपाल सिंग नागरा, संत सिंग ओबेरॉय, राजू सेठी, रिची कोहली, गोल्डी ओबेरॉय, तरंजीत कौर सेठी, टीना ओबेरॉय, डॉली छतवाल, रिंकू ओबेरॉय, व भाजपाचे कार्यकर्ता, जस्मित सिंग ओबेरॉय, शितलकुमार जैन, जाकीर खान, जुनेद खान, रवींद्र जैन, केशव पोद्दार, अमोल पसारी, तरुण पोपट, बिन्नी बिंद्रा, उमेश गुजर, डॉक्टर अरुण पंड्या, आणि अल्पसंख्या आघाडीचे मोठ्या प्रमाणे कार्यकर्ता उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या