Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी विद्यार्थांचे स्वच्छता अभियान

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी विद्यार्थांचे स्वच्छता अभियान


स्थानीय सरस्वती नगर, जुना वाशीम नाका, बायपास, अकोला येथील विष्णुपंत खेंडकर माध्यमीक विद्यालय, स्व. यमुनाबाई  खेंडकर मराठी प्रा. शाळा व स्व. नारायणराव खेंडकर काॅन्व्हेट येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी हा कार्यक्रम विविध अशा बहुरंगी कार्यक्रमातुन विद्यार्थांच्या समवेत साजरा होतो. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबविले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये वाढलेले गवत व गांजर गवत काढून निर्मूलन केले.


 याप्रसंगी शाळेतील मुला व मुलींचा सक्रिय सहभाग होता. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी स्वच्छता अभियान राबवून आदरांजली वाहिली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळेतील परिसरात स्वच्छता करून 'स्वच्छ भारत, समृध्द' भारत अभियानाला चालना देऊन महात्मा गांधी यांच्या उपक्रमास चालना दिली.



कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव व माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक  निलेश खेंडकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर लाभले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती  मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा दिवस अंहिसा दिन म्हणून पाळला जावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. निलेश खेंडकर यांनी आपल्या भाषणातुन मत व्यक्त केले. 


कार्यक्रमाचे संचालन आशा हिवरकर यांनी केले. तर आभार सुरेश सुरत्ने यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी शाळेतील शिक्षक प्रज्ञानंद थोरात, गोपाल वानखडे, उषा जगदाळे, माया खोडके, कांचन वानखडे, मनीषा अंभोरे, मीरा सरदार, भारती लांजेवार, व प्रशांत काळे सौ मुंडे, सौ उपश्याम, सौ उन्हाळे, सौ. खोंड, सौ पांचोली, कुमारी देशपांडे, सौ इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या