स्व. सौ. आईसाहेब खेंडकर स्मृर्ती दिन खेंडकर ज्ञानगंगेत संपन्न
१ ऑक्टोबर स्व. सौ. आईसाहेब उपाख्य मायाताई खेंडकर यांचा स्मृर्तीदिन, सरस्वती नगर, जुना वाशीम नाका, बायपास, अकोला येथील विष्णुपंत खेंडकर माध्यमीक विद्यालय, स्व. यमुनाबाई खेंडकर मराठी प्रा. शाळा व स्व. नारायणराव खेंडकर काॅन्व्हेट येथे संपन्न झाला. दरवर्षी हा कार्यक्रम विविध अशा बहुरंगी कार्यक्रमातुन विद्यार्थांच्या समवेत साजरा होतो. मागील वर्षी शालेय स्तरावर ऑनलाईन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करून कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. आईसाहेब खेंडकर यांच्या पावन स्मुर्तीस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खेंडकर विद्यालयाच्या विशालकाय वटवृक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन महाराज शिक्षण क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब खेंडकर, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन चौधरी तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भावी नगरसेवक सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे पंकज जायले व सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व समाजसेवक प्रदीप थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे सचिव व माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर उपस्थित होते, तर संस्थेचे उपाध्यक्ष व प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश काळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यश मिळाले नसले, तरी पुन्हा प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल असे मत व्यक्त केले. यावर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कॉन्व्हेंट विभागात रंगभरण स्पर्धा, स्मरणशक्ती व चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले. तर वर्ग पहिली व दुसरी साठी रंगभरण स्पर्धा व वाटर कॉइन, वर्ग तिसरी व चौथीसाठी लिंबू चमचा स्पर्धा व रंगभरण स्पर्धा, तसेच वर्ग पाचवी ते सातवी साठी व आठवी ते दहावी साठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये जलसंवर्धन विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या.
नगरसेवक- मंगेश काळे
यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भरगच्च असा आपला सहभाग नोंदविला होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेला स्नेह भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन आशा हिवरकर यांनी केले. तर आभार सुरेश सुरत्ने यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी शाळेतील शिक्षक प्रज्ञानंद थोरात, गोपाल वानखडे, उषा जगदाळे, माया खोडके, कांचन वानखडे, मनीषा अंभोरे, मीरा सरदार, भारती लांजेवार, व प्रशांत काळे सौ मुंडे, सौ उपश्याम, सौ उन्हाळे, सौ. खोंड, सौ पांचोली, कुमारी देशपांडे, सौ इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या