Ticker

6/recent/ticker-posts

संदीप घुगे होणार अकोल्याचे नवे एसपी, 43 पोलिस अधिकाऱ्यांच्या शिंदे सरकारने केल्या बदल्या

संदीप घुगे होणार अकोल्याचे नवे एसपी, 43 पोलिस अधिकाऱ्यांच्या शिंदे सरकारने केल्या बदल्या 



अकोला - राज्यातील 43 पोलिस अधिकाऱ्यांच्या शिंदे सरकारने बदल्या केल्या आहेत. शिंदे सरकारचा हा मोठा निर्णय दिवाळीपूर्वी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर आज शासनाच्या गृहविभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे संदीप घुगे आता अकोल्याच्या एसपी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता संदीप घुगे, कमांडर रा. रा. पोलीस दल गट अ. 11 नवी मुंबई हे अकोला पोलीस अधीक्षकांची कमान घेणार आहेत.मात्र, सध्या अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना कोणत्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे, हे कळू शकलेले नाही.



तथा मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, श्रीम. तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी. पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे व प्रविण पाटील, भारतीय पोलीस सेवा अधिकारी निकेश खाटमोडे, रा.पो.से.  महाराष्ट्र पुलिस अधिनियम कलम २२ तरतुद अनुसार, बदली करण्यात आली पदभार स्वीकारण्याचे आदेश वेगळे काढण्यात येईल अशी सूत्रांकडून माहीती मिळाली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या