आयुष्यातील 41 वर्ष समाजहित साठी रात्र न दिवस निःस्वार्थ झटणारे गुरुवर्य आदरणीय विनायकराव पवार
अ भा मराठा महासंघाचे राष्टीय उपाध्यक्ष,मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक जेष्ठ प्रमुख मार्गदर्शक, एकनिष्ठ,मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे स्व अण्णासाहेब पाटील यांचे सर्वात जुने आणी निष्ठावाण एकनिष्ठ सहकारी, निस्वार्थी ,शिवरायांचे कट्टर मावळे, समाज संघटन वाढीसाठी कायम झटत राहणारे व सर्वाना समान वागणूक देत सोबत घेवुन चालनारे , सभासद , पदाधिकारी यांच्याशी कायम सुसंवाद साधत समाज बांधणीत कार्यशील असणारे आपल्या आयुष्यातील 41 वर्ष समाजहित साठी रात्र न दिवस निःस्वार्थ झटणारे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री विनायकराव जी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी समाजसेवेत कार्यरत असताना समाजसेवा हेच व्रत घेवुन मार्गक्रमण करुन पुढे जात होतो साहेबांच्या चाणाक्ष नजरेने माझ्यातील हे गुण हेरले आणी अखिल भारतीय मराठा महासंघ परिवार मध्ये सहभागी करुन घेतले हे मी माझे भाग्य समजतो.आदरणीय विनायकराव जी पवार साहेबांचे बद्दल सांगायला शब्द अपुरे पडतील, सभासद ते पदाधिकारी यांच्यात सुसंवाद कसा साधावा हे त्यांचेकडून शिकायला मिळाले , कधी मी फ़ोन केला आणी साहेबांनी फ़ोन घेतला नाही हे मला आठ्वत नाही.कितीही व्यस्त असले तरी ते सर्वांशी हितगुज साधीत असतात, संघटना वाढीचा ध्यास घेवुन ते या वयात देखील अगदी एक तरुण वर्गाला ही लाजवेल अशी त्यांची कार्यशैली उत्साहात आणि जाणीवपूर्वक जबाबदारी पार पाडत असतात हे आम्हा सर्व तरुण समाज बांधवासाठी एक दिशा आणी उर्जा देणारे आहे, मी या चळवळीत नविन आहे पण या प्रवाहात त्यांचे सोबत काम केलेले जुने जाणकार लोक जेव्हा त्यांचा महासंघातील स्वर्गीय आण्णासाहेब पाटील साहेब यांच्या सोबतचा समाज बांधनीचा खडतर प्रवास आम्हास कथन करतात तेव्हा त्यांच्या त्यागाची आणी एकनिष्टतेची जाणीव होवुन समाज कार्याची उर्जा निर्माण होते.साहेब तुम्ही आमच्यासाठी समाजसेवेचा एक आदर्श ठेवला आहे तो आदर्श समोर ठेवुन एकनिष्ठपणे कार्य करुन समाज एकसंघ करु. आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो , आपणाकडून अशीच समाजसेवा घडत राहो व आपले मार्गदर्शन आम्हास मिळत राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
अ भा मराठा महासंघ,
युवक ,महिला आघाडी अकोला जिल्हा
सचिन पाटील गोमासे
जिल्हाध्यक्ष
अ भा मराठा महासंघ
सोशल मिडिया अकोला
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या