Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू धर्म संत आचार्य धर्मेंद्र यांचे निधन

हिंदू धर्म संत आचार्य धर्मेंद्र यांचे निधन


आचार्य धर्मेंद्र यांना भाजपाची भावपूर्ण श्रद्धांजली 

जयपूरच्या रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्र जी यांच्या स्वर्गवासाने हिंदू समाजाला नवीन दिशा देणारा एक प्रखर धर्माचार्य आपण गमावला आहे, अशी भावना , खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी व्यक्त केली. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे आचार्य धर्मेंद्र हे प्रमुख नेते होते.
प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले आचार्य धर्मेंद्र हे देशातील हिंदू समाजाला नवी दिशा देणाऱ्या धर्माचार्यात प्रमुख होते. त्यांचा राज राजेश्वर नगर मध्ये चार वेळा जंगी कार्यक्रम झाला त्यांचे विचार त्यांच्यासोबत सानिध्य प्राप्त करण्याचा सौभाग्य मिळाला संत आणि प्रकर वक्ते राष्ट्रभक्त यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


राम जन्मभूमी मुक्तीसाठी त्यांनी सबंध देश पिंजून काढला होता. त्यांच्या भाषणांमुळे देशभरात एक नवचैतन्य निर्माण झाले. हिंदू समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. जयपूरच्या रामदासी मठाचे परंपरागत प्रमुख असल्याने त्यांचे महाराष्ट्राशी एक वेगळेच भावूक नाते होते. त्यांच्या निधनाने अध्यात्म धार्मिक तसेच राष्ट्रभक्ती चळवळीतला फार मोठा धक्का बसला अशा शब्दात प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली आचार्य धर्मेंद्र यांना अर्पण केली अकोला भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल आमदार, हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे, तेजराव थोरात, किशोर पाटील वसंत बाछुका अनुप धोत्रे, अर्चना मसने गिरीश जोशी सिद्धार्थ शर्मा माधव मानकर, संजयजिरापुरेसजयगोडपफोडे सजयगोडा गीतांजली शेगोकार गिरी राज तिवारी, योगिता पावसाळे यांनी सुद्धा आचार्य धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करू न श्रीराम त्यांना सद्गती देवो, त्यांच्या कुटुंबियांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे, असे या शब्दात अकोला जिल्हा भाजपाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या