Ticker

6/recent/ticker-posts

अकोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमोद देंडवे

अकोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमोद देंडवे



वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुखपदी प्रमोद देंडवे यांची नियुक्ती केली आहे, त्यांची अकोला वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि तसेच सरचिटणीस पदी मिलिंद इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या पदाच्या नियुक्तीवरून दोन्ही नवनियुक्त नेत्यांनी त्यांच्या पदावर चर्चा केली. यावेळी गजानन मार्केट स्थित लक्ष्मी ड्रेसेस मध्ये वंचित बहुजन आघाडीचे व्यापारी सेलचे नेते मनोहर पंजवानी यांचे सुपुत्र युवा नेते संदीप पंजवानी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  नवनियुक्त नेत्यांचे अभिनंदन केले.


संदीप पंजवानी यांच्यासह गंगा अटल व्यवस्थापक गोवर्धन रोहडा प्रशासक कैलाश टाकराणी, विनोद अडवाणी, गोकुळ नागवाणी, राम हेमनानी, हरीश कुंगराणी, संजय किर्तक यांनी दोन्ही नेत्यांना शाल आणि मिठाई खाऊ घालून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या