Ticker

6/recent/ticker-posts

सप्तशृंगी म्हणजेच सात पूजा नव्हे, तर सात प्रकारची कामे महिला करू शकतात- डाॅ. सुचिता पाटेकर

सप्तशृंगी म्हणजेच सात पूजा नव्हे, तर सात प्रकारची कामे महिला करू शकतात- डाॅ. सुचिता पाटेकर


अकोला: सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात होतांना दिसत आहे. नवरात्र म्हणजे आपल्या मातृशक्तीला पूजण्याचा अन् त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा उत्सव आहे. आज स्त्रीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या सामर्थ्याचा मोठा ठसा उमटवला आहे. आज कोणतंच क्षेत्र हे महिलांच्या गरुड भरारीपासून दूर राहिले नाही. महिलांनी स्वत:ची ईच्छाशक्ती आणि आत्मबळावर  प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटकेपार रोवले आहेत. अकोला जिल्ह्यासाठी नवरात्र उत्सवाचे महत्व काहीसं वेगळं आहे. कारण, अकोला जिल्ह्याचा कारभार नारीशक्तीच्या बळावर ताकदीनं पुढं चालला आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी'. या म्हणीचा प्रत्यय अकोला जिल्हा प्रशासनात काहीसा वेगळ्या पद्धतीनं येतो आहे. कारण, अकोला जिल्हा शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून डॉक्टर सुचिता पाटेकर यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा अकोला जिल्ह्यात यांनी निर्भीडपणे चालू ठेवलेला दिसत आहे, हे आज नवरात्र दिनी विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे सांगण्यास आपल्याला अभिमानच आहे. डॅशिंग आणि उपक्रमशील शिक्षणाधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. सुचिता पाटेकर या माध्यमिक शिक्षण विभागाचा गाडा अविरत चालवीत आहेत. 

                   डाॅ. सुचिता पाटेकर 

आज त्यांच्यासोबत नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चर्चा केली असता, त्यांनी महिला ही शेतातील मोलमजुरी करणारी असू द्या किंवा नोकरी, अधिकारी पदापर्यंत पोहोचलेली असू द्या, आज ही महिला घरातील कामा बरोबरच आपल्या क्षेत्रातील कार्यालयीन कामे करून उत्कृष्ट कामगिरी बजावीत आहेत. त्याच पद्धतीने आपण शिक्षणाधिकारी असून आपली जबाबदारी ही चोखपणे सांभाळत असल्याचा अभिमान आज नवरात्र उत्सवानिमित्त त्यांनी दिला. शिक्षण अधिकारी अकोला म्हणून देशाच्या विकासाला कशा पद्धतीने हातभार लागेल एवढाच विचार डोळ्यासमोर ठेवून आपले काम सदैव तत्परतेने करीत असतात. एक शिक्षणाधिकारी म्हणून देशाच्या विकासाला आज विज्ञान वरदान ठरत आहे आणि हे काम अतिशय चोखपणे आपण करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्पर्धा परीक्षा व इस्रो संघटना अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याचा विचार त्या करीत असतात. आज नवरात्राच्या काळात इन्स्पायर अवार्ड मध्ये अकोला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. पुणे जिल्ह्याला मागे पाडत अकोल्याने इन्स्पायर अवार्ड मध्ये ही विशेष प्रगती दाखविली आहे, याचा अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी सर्वांची खूप मेहनत मिळाली आहे, यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्या म्हणाल्या. नवरात्र उत्सवा दरम्यान त्यांनी सप्तशृंगी म्हणजेच सात पूजा नव्हे, तर सात प्रकारची कामे ह्या महिला करू शकतात, त्याचे प्रतीक आपण आहोत, असे त्यांनी यावेळी सुचविले व नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या