Ticker

6/recent/ticker-posts

अकोला ते डोंगरगाव मासा बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी

अकोला ते डोंगरगाव मासा बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी


अकोला ते डोंगरगाव मासा बस सेवा सुरू करणे बाबत मा. व्यवस्थापक एस टी महामंडळ अकोला यांना भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या वतीने निवेदन देण्यात आले. अकोला ते डोंगरगाव मासा बस सेवा कोरोना काळाआधी नियमित सुरु होती. मध्यास्थित कोरोनाच्या नियमात प्रशासनाने नियम शिथिल केलेत. परंतु एस टी महामंडळाने बस सेवा अद्यापर्यंत सुरू केली नाही. त्यामुळे या भागातील विशेषता शाळा, कॉलेज, आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व वृध्द, अपंग, तथा मोल मजुरी साठी शहरी भागात जाणारे नागरिक बस सेवा सुरु नसल्या कारणामुळे त्रस्त आहेत.आणि परिणामी त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांची अर्थात विद्यार्थ्यांची खाजगी वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणत लूट होत असल्याचे निदर्शनात येत आहे.


यासाठी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या वतीने फोरमचे संस्थापक अध्यक्ष मा. अय्युभाई कच्ची प्रदेक्षाध्यक्ष शेरखान यांच्या मार्गदर्शनात फोरमचे अकोला जिल्हाध्यक्ष आकाश जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली युथ विभाग अकोला जिल्हाध्यक्ष राहुल संतोष खाडे यांनी निवेदन दिले. त्यावेळी डोंगरगाव मासा व बाभुळगाव येथील साहिल वानखेडे, संतोष आगलावे, विकास शिरसाट सचिन तायडे, किशोर इंगळे, विकी वानखेडे, राम इंगळे, नदीम शेख, अभिषेक जामनिक, शुद्धोधन इंगळे, अपंग महिला मंदा महादेव इंगळे, वैभव इंगळे, भारत उपराळे , प्रज्ञा ढवळे, प्रज्ञा इंगळे,साक्षी देवकर, रोहिणी नीलखन, ईश्वरी बोळे, , आदी विद्यार्थि तथा गावकरी नागरिक उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या