Ticker

6/recent/ticker-posts

मुर्तिजापुर तालुक्यात गावखेड्यातील बस सेवा सुरू करा

मुर्तिजापुर तालुक्यात गावखेड्यातील बस सेवा सुरू करा


----------------------------------------
अकोला जिल्हा आलं इंडिया पँथर सेनेची मागणी
----------------------------------------
मुर्तिजापुर प्रतिनिधी- बाळासाहेब गणोरकर

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुर्तिजापुर विभागाच्या अधीनस्त सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन रामटेक , मंदूरा मार्गे नवसाळ तसेच मुर्तिजापुर मधापुरी मार्गे कुरुम पर्यंतची बस सेवा सुरू करून परिसरातील तमाम विद्यार्थ्यांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी मात्र याकडे हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी मुर्तिजापुर विभागाची राहील असा इशारा आलं इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांनी दिला आहे.


 महाविद्यालयांना सुट्टी झाल्यानंतर या गावाकडे जाणारी बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत असून विद्यार्थ्यांना गावाकडे कोणत्या साधनाने जावे अशी समस्या निर्माण झाली असून या समस्यांमुळे एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार, या मार्गावर कायम स्वरुपी बस सेवा सुरू न करण्याचे कारण काय, बस सेवा सुरू करणार किंवा कसे, यास जबाबदार कोण असे प्रश्न जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांनी उपस्थित केले असून एस. टी. विभाग सुस्त आणि विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत.

             ☝️ बाईट 
परवेज खान अकोला            जिल्हाध्यक्ष आलं इंडिया पँथर सेना

याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या मुर्तिजापुर विभागाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीव पूर्वक गांभीर्याने सम्यक विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून आंदोलन करण्यापूर्वी मुर्तिजापुर बस स्थानकावरून बस सेवा सुरू करण्याची तसदी घ्यावी . अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आलं इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष परवेज खान , उपाध्यक्ष राजेंद्र सदांशीव , तालुकाध्यक्ष मंगेश बागडे , शहराध्यक्ष धम्मा बागडे , तालुका सचिव साबीर शाह व उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला आहे .
--------------------------------------


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या