Ticker

6/recent/ticker-posts

सम्राट अशोक ब्रिगेड ची घुसर येथे प्रबोधन सभा

सम्राट अशोक ब्रिगेड ची घुसर येथे प्रबोधन सभा
   

                    
बौद्धांच्या प्रश्नांसाठी झाले मंथन. भर पावसात आंबेडकरी समूहाचा प्रतिसाद. सम्राट अशोक ब्रिगेड कार्यकारिणी चे वतीने बौद्धांचे प्रश्न वर्तमान आणि भविष्यकालीन आव्हाने या विषयावर जिल्हाभर प्रबोधन अभियान सुरू आहे. दिनाक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी घूसर येथील तक्षशिला बौद्ध विहार येथे प्रबोधन सभा घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश मोरे सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रा विजय आठवले यांची उपस्थिती होती,ब्रिगेडचे जिल्हा महासचिव निरंजन भाऊ वाकोडे प्रभाकर कवडे दादा या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रमात बौद्ध समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक,राजकीय धार्मिक अश्या सर्व मुद्द्यावर रोखठोक मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन भीमराव गोप नारायण यांनी केले तर तक्षशिला बौद्ध विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुसळधार पावसात सुद्धा आंबेडकरी समूहाने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या