Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पातुर रोडवरील न्यू हिंगणा येथे दोन ट्रकचा भीषण अपघात; अपघातामध्ये दोन ट्रक चालक गंभीर...!

अकोला पातुर रोडवरील न्यू हिंगणा येथे दोन ट्रकचा भीषण अपघात; अपघातामध्ये दोन ट्रक चालक गंभीर...!


अकोला - पातूर रोडवरील मालेगाव कडे जाणाऱ्या डिझेल ने भरलेला टँकर आणि अकोला कडे येणाऱ्या रोडवर काम करणारा डंपर अशोक लिलँड ट्रकचे समोरच्या बाजूचे टायर फुटल्याने, चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की अकोलाकडे येणारा मध्यप्रदेश मधील असलेल्या स्थानिक अकोल्यातील रोड चे काम करणाऱ्या MH- 20, EL 2666 मशीन अशोक लिलँड ट्रका चे समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या ट्रक चालक शेख निसार शेख जाफर या डिझेल टँकर MH 37-J-0551 या ट्रकवर समोर जाऊन आढळला त्यामुळे दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ सवोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे हिंगणा गावातील नागरिकांच्या मदतीने प्रसंगावधानाने मदत करून उपचारार्थ दाखल केले. 


सदर टँकर मध्ये डिझेल असल्यामुळे सुदैवाने टँकरने पेट घेतला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शासकीय रुग्णवाहिका 108 सदर घटनास्थळी आणि अकोला महानगरपालिका फायर ब्रिगेड विभागाला तत्काळ मदत करण्यात आल होत. सदर घटना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडल्यामुळे जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन दाखल झाल. मागील दोन तासापासून वाहतुकीची कोंडी या ठिकाणी निर्माण झाली होती. हे जुने शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू होता. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या