अकोट फैल येथील मोर्णा नदीत सापडला मृतदेह
अकोला- अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या गाव कानडी शिवार ला लागून वाहणाऱ्या मोर्णा नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिकरित्या मृतदेह पाहिल्यानंतर हा मृतदेह काही दिवस पाण्याखाली असल्याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. नुकत्याच सूत्रांच्या माहितीनुसार मृत व्यक्ती हा शेख फिरोज शेख निजाम याचा असल्याची खात्री नातेवाईकांनी केली आहे. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्लत कॉलनी येथील इक्राची अपार्टमेंट येथे राहत असल्याचेही सांगीतले आहे. मयत शेख फिरोज हा 21 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8:00 वाजता हॉटेल ताज रेल्वे स्टेशन परिसरातून बेपत्ता झाला होता, त्याचा शोध पोलीस घेत होते, अखेर आज त्याचा मृतदेह गाव कानडी शिवार येथे नदीत सापडला. तरी मृतदेहाच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरून मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, मृत व्यक्तीसोबत काही अनुचित प्रकार घडला आहे का आणि कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या आहे की तरुणाची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकून दिला, हे पोलीस तपासात समोर येणार आहे. पुढील तपास अकोट फैल पोलीस स्टेशन चे कर्मचारी करीत आहेत.
0 टिप्पण्या