भाजपा पूर्व मंडळ युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भाजपा पूर्व मंडळ युवा मोर्चाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री ना. संजय धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल ,महापौर सौ अर्चना मसने , युवा नेते अनुप धोत्रे, डॉ विनोद बोर्डे,संजय जीरापुरे, संजय गोटफोडे,संजय गोडा,अक्षय गंगाखेडकर, किशोर मांगटे पाटील,जयंत मसने ,पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष उमेश गुजर, भाजपा पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशव हेडा यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी युवकांना समाज कार्यामध्ये उत्साहाने सहभागी होऊन प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून देश घडवण्यास पुढे यावे युवकांनी स्वतःतील कर्तृत्व ओळखून नाविन्यपूर्ण उपक्रम व व्यवसाय करून प्रगती साधावी असे आवाहन केले. आमदार गोवर्धन शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व युवकांना शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या विकासामध्ये युवकांचा मोठा वाटा असून संस्कृती जोपासत प्रगतीकडे वाटचाल करावी असे सुचविले. आमदार वसंत खंडेलवाल यांनी याप्रसंगी युवकांनी सकारात्मक ते कडे कल ठेवावा व प्रगतीच्या नव्या वाटा शोधून अनन्यसाधारण यश प्राप्त करावे व युवकांनी उद्योगी होऊन रोजगार निर्मिती मध्ये हातभार लावावा व देशाची प्रगती मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले
महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सेवा सप्ताह अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमांना भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अभिनंदन केले व भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन काम करणारा पक्ष असून शोषित, वंचित, पीडितांना न्याय देणारा पक्ष आहे , भाजपा विकासाच्या दिशेने देशाला पुढे नेणारा व जनसामान्याच्या जीवनात भरभराटी आणणारा पक्ष आहे असे प्रतिपादन केले. या शिबिरात महिलांची लक्षणे उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने सौ अश्विनी हातवळणे, सौ चंदा शर्मा, नगरसेविका सौ सारिका जयस्वाल, सौ सुमन गावंडे, सौ वर्षा गावंडे, डॉक्टर सुरांसे मॅडम उपस्थित होत्या.
रक्तदाते उमेश श्रीवास्तव, संदीप गावंडे, ,शुभम चंदन तुषार माळी, ऍड आकाश वरणकर, गौरव भट्टड, दिग्विजय जोशी ,ऍड यशवंत दांदळे, मिहीर मुंगेलकर, अंकुश जामनेकर, शुभम श्रीवास्तव, प्रणव कडू, ऋषिकेश पोकळे, शुभम तिवारी, शिवम ठाकुर,शुभम गोळे, जितू देशमुख, अर्पित बगडिया ,वेदांत बगडिया, शुभम चोपडे, मेहेर इंगळे ,योगेश फुसे, रवी यादव,अमित चाळीसगवकर, अंकुश कांगटे, यश धनभर, अभिजीत कडू विशाल पागृत ,सुगत गवई, उत्कर्ष कुलकर्णी, संतोष टापरे,श्रीकांत धनभर आदींनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले.
कार्यक्रमास नगरसेवक हरीश काळे, सागर शेगोकार,आशिष पवित्रकार, माणिक नालाट, धनंजय गिरधर, पवन महल्ले, मनीराम टाले ,केशव पोद्दार, गणेश सारसे, युवा मोर्चा महानगर सरचिटणीस निलेश काकड, अभिजीत बांगर, उज्वल बामनेट, ऍडव्होकेट कुणाल शिंदे, अक्षय जोशी, अतुल गोंधळेकर, रुपेश जयस्वाल,उमेश श्रीवास्तव, जितेंद्र देशमुख, शिवलाल इंगळे, अनिल नावकार, मधुकर रगडे, सुधीर गावंडे, रितेश जामनारे, संदीप गावंडे, अभिजीत कडू ,आकाश ठाकरे राहुल पाटकर, ऋषिकेश पोकळे, शुभम चंदन, जितेंद्र पाटकर, शिवम ठाकुर, नितीन राऊत, विवेक झापर्डे, वेदांग बगडिया, दिग्विजय जोशी, शुभम गोळे, हे प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाकरिता डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे श्री रमेश जी देशपांडे व त्यांच्या टीम चे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन शुभम चंदन यांनी केले तर आभार प्रदेश प्रदर्शन ऋषिकेश पोकळे व शिवम ठाकूर यांनी केले
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत महाकाली हॉटेल ते जुना इन्कमटॅक्स चौक पर्यंत रस्त्याचे भूमिपूजन
मा.श्री विजयभाऊ अग्रवाल (महानगर अध्यक्ष भाजपा)
आमदार श्री गोवर्धनजी शर्मा
आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर
आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल,
महापौर सौ अर्चनाताई मसने,
उपमहापौर श्री राजेंद्र गिरी,
सभापती श्री संजयभाऊ बडोणे,किशोर मांगटे पाटील, अनुपभाऊं धोत्रे, संजय गोटफोडे, गणेश अंधारे, बाळ टाले, सौ शारदा खेडकर, सौ मनीषा भन्साली, दीप मनवाणी,जयंतराव मसने,धनंजय धबाले, गजानन सोनोने, सिद्धार्थ वरोठे, रणजित खेडकर,रवींद्र भन्साळी, सौ सुमनताई गावंडे, सौ चंदाताई शर्मा, देवकते ताई, मनीष बुंदेले, श्रीकांत गावंडे, हिरा कृपलानी, राजु अग्रवाल, राजेश रेड्डी सचिन देशमुख, नितीन राऊत, दत्ता पोटे,अजय ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले अकोला शहरातील विविध भागाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध असून शहराचा भौगोलिक सामाजिक विकास करण्यासाठी आपण तत्पर राहणार आमदार शर्मा यांनी सांगून जनतेचा विश्वास कायम करण्यासाठी तत्पर राहू असे सांगितले आ. वसंत खंडेलवाल समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाला महानगर पदाधिकारी, मंडळातील सर्व पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या