Ticker

6/recent/ticker-posts

गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न


वसुंधरा केअर फाऊंडेशन ,अकोला व महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब ची झाडे लावली गेली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा गांधींच्या पुतळ्याला वसुंधरा चे डॉ. योगेश पालीवाल यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. महेश डाबरे यांनी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री. विलास झामरे यांना स्मृती भेट म्हणून रोपटे असलेली कुंडी दिली, डॉ. योगेश पालीवाल यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारे फलक सरपंच सौ. सुषमा ठाकरे यांना दिले, डॉ. डी. टी. देशमुख यांनी झाडे लावा, झाडे जगवा चे फलक भेट म्हणून गांधिग्रामच्या माजी सरपंचांना दिले. डॉ. महेश डाबरे यांनी महात्मा गांधींच्या विचारधारेला पुढे नेण्याकरिता स्वच्छता व वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.
डॉ. योगेश पालीवाल यांनी पर्यावरण रक्षणाकरिता प्लास्टिक कॅरीबॅग चा वापर टाळणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले. 


तसेच यावर मात करण्यासाठी "प्लास्टिक बँक" ची सुरुवात करण्याची गरज असल्याचेही नमूद केले. डॉ. डी. टी. देशमुख यांनी "सीड बँक" म्हणजे घरी खाल्लेल्या फळांच्या बिया कचऱ्यात न फेकता स्वच्छ करून वाळवून गोळा करणे व त्यातून रोप तयार करणे यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य श्री. विलास झामरे यांनी विद्यालय परिसरात हिरवळ निर्माण करण्याकरिता सर्वतो परी प्रयत्न करू व लावलेली सर्व झाडे जगवू असे आश्वासन दिले.गांधिग्रामच्या सरपंच सौ. सुषमा ठाकरे यांनी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यालयाचे पर्यवेक्षक गजानन राणे, ग्रंथपाल संजय इंगळे, माजी सरपंच शरद ठाकरे, अतुल काठोळे, संजय माजरे, विद्यालयाचे श्री संदीप ओहेकर, नारायण बावणे, गणेश कूले उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या