वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसचा मोफत प्रवास
अकोला जिल्हा भाजपाने
यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन !
अकोला
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेच्या माध्यमातुन राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याबद्दल आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. त्यांनी दिलेल्या संस्कारातुन हा समाज खंबीरपणे उभा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त या निर्णयाच्या माध्यमातुन ज्येष्ठ नागरिकांचा भाजपा-शिवसेना युती शासनाने केलेला हा सन्मान महत्वपूर्ण तसेच औचित्यपूर्ण आहे, असेही अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर म्हटले आहे.
0 टिप्पण्या