Ticker

6/recent/ticker-posts

नवीन मंत्रिमंडळाच्या विस्तारात वाचा कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाते

नवीन मंत्रिमंडळाच्या विस्तारात वाचा कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाते


मुंबई, दि. 9 : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.शपथविधी सोहळ्यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला.


एकुण शपथ घेणारे 18 मंत्री-

मा.श्री.एकनाथ शिंदे मा.मुख्यमंत्री, नगर विकास विभाग 
मा.श्री.देवेन्द्र फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री, वित्त, गृह
1) राधाकृष्ण विखे पाटील भाजप, महसूल, सहकार
2) सुधीर मुनगंटीवार भाजप, ऊर्जा व वन
3) चंद्रकांत दादा पाटील भाजप, सा.बा.
4) विजयकुमार गावित भाजप, आदिवासी
5) गिरीश महाजन भाजप, जलसंपदा
6) गुलाबराव पाटील शिवसेना, पाणी पुरवठा
7) दादासाहेब भुसे शिवसेना, कृषी
8) संजय राठोड शिवसेना, ग्राम विकास 
9) सुरेश खाडे भाजप, सामाजिक न्याय 
10) संदिपान भुमरे शिवसेना, रोजगार हमी
11) उदय सामंत शिवसेना, उद्योग
12) तानाजी सावंत शिवसेना, उ.व तं. शि
13) रवींद्र चव्हाण भाजप, गृह निर्माण 
14) अब्दुल सत्तार शिवसेना, अल्पसंख्य विभाग 
15) दीपक केसरकर शिवसेना, पर्यटन व पर्यावरण
16) अतुल सावे भाजप, सा.आरोग्य
17) शंभूराजे देसाई शिवसेना, राज्य उत्पादन शुल्क
18) मंगल प्रभात लोढा भाजप, विधी व न्याय


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या