अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील सेवा समिती चे वतीने भाऊबीजेच्या दुसर्या दिवशी उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन
अकोला— दिवाळी सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि समाजातील सोयरीक संबंधासाठी सोईस्कर ठरावे म्हणून अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे संयुक्त विद्यमाने भाऊबीजेच्या दुसर्या दिवशी गुरुवार दि.२७आँक्टोबर २०२२ ला भव्य उपवर युवक-युवती परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.रणजीत सपकाळ,पाटील सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार,सचिव श्रीकृष्ण विखे,अकोला जिल्हा मराठा मंडळाचे सचिव प्रकाश पाटील यांनी दिली आहे.
या वर्षातील हा पहिला परिचय मेळावा असल्याने राज्यभरातील समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहिल शिवाय दिवाळी सुट्टी म्हणुन आयोजन समिती आतापासुन सक्रीय झाली आहे.
समाजातील सोयरीक संबंध जुळवणे दिवसेंदिवस कठिण होत आहे.सर्वांना एका विचारपीठावर आणुन सुसंवाद घडावा म्हणून अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समिती दरवर्षी परिचय मेळाव्याचे आयोजन करीत आहे.
0 टिप्पण्या