शेळी चोरणाऱ्या दोघांना चान्नी पोलिसांनी केली सहा तासात अटक
प्रतिनिधी नासीर शेख
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत बल्लाडी येथील महिला पशुपालक आशाबाई रामराव बाबर यांची शेळी २७ ऑगस्ट रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्याने लंपास केली याबाबतची तक्रार त्याच रात्री महिला पशुपालक यांनी चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली महिला पशुपालक यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अविनाश मोहिते, सुनील भाकरे, सुधाकर करवते, दत्तात्रय हिंगणे, यांचा पथक गठीत करून बल्लाडी येथे तपासासाठी पाठविले, पथकाने तपासाची चक्र फिरून अवघ्या सहा तासात बल्लाडी येथील आरोपी अबाजराव बाजीराम शिंदे, व कैलास लक्ष्मण शिंदे, या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून शेळी जप्त करून महिला पशुपालक यांच्या स्वाधीन केले दोघे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अविनाश मोहिते करीत आहे.
0 टिप्पण्या