Ticker

6/recent/ticker-posts

चान्नी पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिर

चान्नी पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिर


प्रतिनिधी नासीर शेख 
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट रोजी चान्नी पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने केले जाते, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल ताले व चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, व उप निरीक्षक गणेश महाजन यांच्या पुढाकाराने पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी विठ्ठल ताले, कपिल खरप, राजरत्न कांबळे, श्रीचंद पवार, गणेश पिसोळे, विपुल,अनिकेत काळे,पवन वान्डे, पंकज ताले,आदी उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या