स्व.डॅडी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त '' रंगभरो स्पर्धा
आज स्व.डॅडी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त '' *रंग* *भरो* " स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शिक्षण संकुलातील न्यू इंग्लिश हायस्कूल या केंद्रावर आज *800* च्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.या स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल, जिजाऊ कन्या विद्यालय,ज्युबिली इंग्लिश हायस्कूल,प्रभात किड्स,लिटील स्टार कॉन्व्हेंट,खंडेलवाल इंग्लिश स्कुल,भारत विद्यालय ,जि. प.शाळा,श्री.शिवाजी हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय अशा विविध शाळेंनी सहभाग घेतला. या स्पर्धेला भव्य असा प्रतिसाद लाभला.बाबूजी वाचनालय व ललित अकादमी,अकोला यांच्या तर्फे स्पर्धेकरिता जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच उत्तम नियोजन करून स्पर्धा यशस्वी करण्याबद्दल आयोजकांनी अकोला एज्युकेशन सोसायटीचे आभार मानले.या स्पर्धेला अकोला एज्युकेशन सोसायटीचे मा.अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब मांडवगणे सर यांची उपस्थिती लाभली.सरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे अवलोकन करून बाल कलावंतांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी होण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री.माधव मुनशी सर,उपमुख्याध्यापक श्री विज्ञान रेलकर सर,पर्यवेक्षक श्री दत्तात्रय तारे सर, शाळेचे शिक्षक वृंद श्री संजय पांडे सर,श्री उदय हातवळणे सर,श्री अनिल देवीकर सर,श्री प्रशांत हळवे सर ,श्री सचिन ताडे सर ,सौ.किरण राठोड मॅडम,सौ.जयश्री नवलकार मॅडम,सौ.रसिका मोहरीर मॅडम,सौ.मुरळ मॅडम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री संजय अघडते, श्री संजय जोशी,श्री पंकज जोशी,सौ.ज्योती कासमपुरे यांचे सहकार्य लाभले.एकंदरीत उत्साही वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या