Ticker

6/recent/ticker-posts

प्लास्टिकचा भस्मासुर स्लाईड शो

प्लास्टिकचा भस्मासुर स्लाईड शो


 आज न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे निसर्गकट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण व निसर्ग संवर्धनाचा संदेश *प्लास्टिकचा भस्मासुर* स्लाईड शो दाखविला तसेही निसर्ग कट्टा विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून पर्यावरण जतन करण्याचा संदेश देण्याचा संकल्प सतत करत असते आदरणीय डॉ. पाटेकर मँडम माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात हा स्लाईड शो केला , तो स्लाईड शो न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक श्री माधव मुनशी सर यांच्या परवानगीने , निसर्ग कट्टा चे सभासद श्री नंदकिशोर थुटे सर यांनी शाळेत आयोजन केले. या स्लाईड शो ला शाळेतील वर्ग 5 ते 8 मधील सर्व विद्यार्थी हजर होते तसेच शिक्षक -शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर थुटे सर यांनी केले स्लाईड शो च्या साह्याने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी अमोल सावंत सर यांनी संवाद साधला. विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे दिली आणि विद्यार्थ्यांना सर्व प्रथम प्लास्टिकचा वापर टाळावा असा अनमोल सल्ला दिला आजच्या पिढीला खरंच त्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही सदैव अशा उपक्रमाला चालना देतो आमची शाळा सहभागी होत असते. त्याबद्दल अमोल सावंत व निसर्ग कट्टा चे शतश: आभार.!.
नुकतचं संपुर्ण भारतात सिंगल युज प्लास्टीक वर बंदी जाहीर झाली आहे. भविष्यात प्लास्टीकची समस्या कमी करायची असले तर नविन पिढीला म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांना या समस्येची ओळख करून देणे गरजेचे आहे. असं आम्हांला वाटतं, म्हणून गेली 5 वर्षापासून निसर्गकट्टा या विषयावर कार्य करीत आहे. या शैक्षणिक सत्रात आम्ही हा शालेय उपक्रम राबविला.


 *प्लास्टीकचा भस्मासुर* हा स्लाईड शो तयार केला आहे. या स्लाईड शो मध्ये अकोल्यात प्लास्टीक कैरीबँगमुळे काय समस्या व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. साधारण 45 मिनिटाचा हा स्लाईड शो आहे. तरी या स्लाईडशो चे आ़योजन आम्ही आमच्या शाळेत केले.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री दत्तात्रय तारे यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा हा सर्व उपस्थितांना संदेश दिला आपणही प्लास्टिकचा वापर टाळावा हि नम्र विनंती.. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या