पंकज जायले यांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
अकोला-शिवसेनेला जिल्ह्यात नवी शक्ती,नवा जोम मिळावा यासाठी जिल्ह्यातील तरुण,युवा कार्यकर्ते पंकज जायले यांनी शिवसेनेत प्रवेश करून जिल्ह्याला नव उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.आपल्या शेकडो मित्र मंडळी समवेत जिल्हाप्रमुख आ.नितीन बापू देशमुख यांच्या नेतृत्वात पंकज जायले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्या समवेत थेट मातोश्रीवर जाऊन सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.माजी मंत्री तथा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश प्रसंगी संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,आ.तथा जिल्हाप्रमुख नितीनबापू देशमुख,जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर,सेना उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मंगेश काळे,उप शहर प्रमुख केदार खरे,उमेश जाधव आदी उपस्थित होते. पंकज जायले यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक सेवाभावी कार्य केले आहेत.
सार्वजनिक शिवजयंतीच्या माध्यमातून अनेक प्रबोधनात्मक व देशप्रेमाचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.ते दिव्यांग,पर्यावरण व माझे शहर माजी जबाबदारी या अभियानाचे जनक असून अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा दाट परिचय आहे. राजकीय क्षेत्रात एक अजात शत्रू म्हणून त्यांची ख्याती आहे.पंकज जायले यांच्या पक्षप्रवेश प्रसंगी यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद, उद्धवराव ठाकरे जिंदाबादचे नारे लावून आनंद व्यक्त केला.जिल्ह्यात नव्या जोमाने सदस्य जोडो अभियान राबवून सेना प्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्या कुशल मार्गदर्शनात तथा जिल्हाप्रमुख नितीन बापू देशमुख यांच्या नेतृत्वात जोमाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार जायले यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी मनोज महाजन, संतोष मसने,बंडू सवई,प्रमोद धर्माळे,सतीश मदनकार, सतीश डांगे,संजय दशमुखे आदी उपस्थित होते.पंकज जायले यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या