महापालिका निवडणूक विदर्भ माझा सज्ज!
महिलांना निवडणूकमधे ५० टक्के आरक्षण
अकोला # आगामी महानगर पालिका निवडणूकीसाठी विदर्भ माझा पार्टी सज्ज झाली असून विदर्भ विकास तसेच महानगराच्या विकासाठी कटीबध्द असलेल्या आणि लढविण्यासाठी इच्छूक आरक्षण असलेल्यांना पक्षातर्फे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले यांनी केले आहे. या निवडणूकीत युवकांना प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षीत करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
विदर्भाच्या विकासासाठी कटीबध्द असलेली व विदर्भातील महापालिका क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सज्ज असलेल्या विदर्भ माझा पार्टीने अकोला महानगर पालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. या निवडणूकीत तरुणांना संधी देण्यासह महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षातर्फे घेण्यात आला आहे. यामुळे ईच्छुकांनी पक्षाच्या अकोला येथील कार्यालयात सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करावें असे आवाहन जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले यांचेतर्फे करण्यात आले आहे.
विकासासाठी उत्तम पर्याय विदर्भ माझा पक्षाने युवकांना संधी देण्यासाठी प्राधान्य दिले असून महिलांनाही पुढे येण्यासाठी ५० टक्के जागा आरक्षीत ठेवल्या आहेत. अकोला महानगर पालिकेमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच विदर्भाचे राजकारण बळकट करण्यासाठी इच्छूकांना ही सुवर्ण संधी आहे. अजाबराव टाले, जिल्हाध्यक्ष विदर्भ माझा पार्टी.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या