महिलेवर अत्याचार प्रकरणी दोघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
नासीर शेख
पातूर: चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अतिदुर्गम भागाच्या एका गावातील मूकबधिर ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्यचार केल्या प्रकरणी दोन आरोपींना १४ दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पातुर नाल्याने शुकरवारी दिले आहे. एका गावातील मूकबधिर महिलेला दारू पाजून दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवार दि.१८ जुलै रोजीच्या सकाळी उघडकीस आली होती, सावरगाव येथील विनोद लठाड ३७ , व निलेश बोरकर ३२, या दोघांनी दि.१७ जुलै रोजीच्या सायंकाळी मूकबधिर महिलेला दूचाकीवर बसून सावरगाव येथे एका घरात नेले,तिथे मूकबधिर महिलेला मारहाण करून दारू पाजली, महिला मद्यधुंद झाल्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला होता,पीडित महिलेच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी सावरगाव येथील आरोपी विनोद लठाड व निलेश बोरकर, या दोघेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती, न्यायालयाने दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती, पोलिस कोठडी संपल्याने २२ जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता,१४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश महाजन करीत आहे.
दुचाकी, काठी व इतर साहित्य जप्त
दोघे आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, पोलिसांनी दुचाकी व मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेली काठी व इतर साहित्य जप्त केले आहे.
प्रतिक्रिया
सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश न्यायालयाने दिले आहे.गुन्ह्यात वापरण्यात आलेली दूचाकी, काठी व इतर साहित्य जप्त केले आहे.
गणेश महाजन उपनिरीक्षक तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक पो. स्टे. चान्नी
0 टिप्पण्या