श्रीमती शशीकलाबाई काशीनाथजी तिडके यांना विवीध मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
हिवरखेड.21 जुलै हिवरखेड येथील अकोट मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय काशिनाथजी तिडके यांच्या धर्मपत्नी ,तसेच भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ व भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत डॉक्टर राम तिडके, कृष्णा तिडके, गजानन तिडके व कैलास तिडके यांच्या मातोश्री श्रीमती शशिकलाबाई काशिनाथजी तिडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली ,व ज्येष्ठ मार्गदर्शका पासून आम्ही भाजपा परिवार वंचित झालो. तिडके परिवाराला दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो अशा शब्दात माजी केद्रीय राज्यमंञी खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी शोक संदेश पाठवून आपली श्रद्धांजली अर्पण केली.
तसेच फत्तेपुरी स्मशानभूमीत आपल्या भावना व्यक्त करतांना श्रीमती शशिकलाबाई तिडके समाज हितासाठी झटत होत्या त्यांचे संस्कार, अध्यात्म क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान होते अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली माजी राज्यमंञी गुलाबराव गावंडे यांनी व्यक्त केली.स्व.डॉ.का.शा. तिडके यांच्या अकाली निधनानंतर श्रीमती शशिकलाबाई तिडके यांनी तिडके परिवाराला सावरून त्यांची उणीव भासू दिली नाही अशा शब्दात नारायणराव गव्हाणकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शाम भोपळे ,प्रकाश राऊत ,रमेश दुंतोडे यांच्या सह सर्व पक्षिय नेते विवीध सस्थां ओमशांती शाखा हिवरखेड यांचे कडुन श्रीमती शशिकलाबाई तिडके यांना श्रद्धांजली पर पुष्पसुमने वाहन्यात आली यावेळी त्याचे सुपुत्र राम,कृष्णा, कैलास गजानन ,यांच्याकडुन चितेला अग्णी देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेत पंचक्रोशितील हजारो लोकांनी ऊपस्थीती दर्शवीत श्रद्धांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या