प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदारयादी मध्ये ही घोळ, महेंद्र डोंगरे यांनी घेतली हरकत
अकोला --शहरात मनपा निवडणूक पूर्वी मतदार याद्या अद्यावत करण्यात आल्या आहेत मात्र त्यामध्ये अनेक घोळ आहेत या मतदार याद्यांमध्ये मृतक मतदारांची नावे वगळली नाहीत तर शहर सोडून गेलेल्या मतदारांचीही नांवे कायम आहेत अश्या तक्रारी मनपा निवडणूक विभागाकडे करणे सुरू आहेत मतदार याद्यांवर हरकती नोंदविण्यासाठी आज अंतिम संधी आज होती त्यानुसार आज प्रभाग क्रमांक 10 साठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी हरकत नोंदवली आहे
त्यांनी नोंदविलेल्या हरकत मध्ये स्थानिक रहिवाशी मतदारांची नावे गहाळ आहेत तर मृत मतदारांची नांवे कायम आहेत तर अकोला सोडून पुण्यात स्थयीक झालेल्या मतदारांची नावे कायम आहेत तसेच प्रभागाबाहेरील उमरी मधील लोकांचे नाव प्रभाग दहा मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे हरकती घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने या हरकतींची नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी पक्षाचे माजी गटनेता. गजानन गवई. बुद्ध रतन इंगोले. सीमांत तायडे. मनोहर बनसोड. चंद्रशेखर नकाशे सोनु वासनिक विक्रांत सोनवणे. आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या