टावर चौक ते रतनलाल प्लॉट रस्त्याचे बांधकाम सुरू
अकोला टावर चौक ते रमेश बजाज यांच्या निवासाला समोर सिमेंट काँक्रिटी रस्त्याचे काम स्टेट बँक आणि महानगरपालिका यांच्या न्यायालयीन लढाईमुळे थांबले होते परंतु अकोला पूर्वचे आमदार विकास पर्व साठी प्रयत्नशील रणघीर भाऊ सावरकर यांच्यामुळे महानगरपालिकेच्या ताब्यातील तीन फुटाचा रस्ता विस्तारीकरणाचा काँक्रिटीकरण काम सुरू झाला आहे सातत्याने सर्वसामान्यांना सुविधा मिळावी यासाठी आमदार सावरकर प्रयत्नशील असतात त्यांनी या संदर्भात न्यायालयीन लढाई सुप्रीम कोर्टात सुरू असताना ज्या जागेचा वाद नाही त्या १२४ मीटर रस्त्याचे विस्तारीकरण महानगरपालिकेने करून दळणवळणाची सुविधा सर्वसामान्यांना मिळून द्यावी.
यासाठी भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल व महापौर अर्चनाताई मसने यांच्या कडे जबाबदारी सोपवून आयुक्त श्रीमती त्रिवेदी यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने व अनेक दिवसापासून होणारी असुविधा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे व पश्चिम पूर्व या भागाला जोडणारा नवीन आणि जुन्या शहराला महत्त्वाचा सेतू ठरणारा रस्त्याचा काम आरंभ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे या या रस्त्यामुळे दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे. वाहतुकीची कोंडीचा मार्ग सुटणार आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या